शिरोली तर्फे आळे गावामध्ये विकासपर्वाला सुरुवात

1 min read

शिरोली तर्फे आळे दि.३:- शिरोली तर्फे आळे (ता.जुन्नर) गावच्या जय श्रीराम पॅनल च्या विजयी नवनिर्वाचित उच्चशिक्षित सरपंच प्रिया अजित खिलारी यांना सरपंच पदाचा पदभार घेऊन अवघे ३ महिने झाले असतानाही त्यांचे मार्गदर्शक जुन्नर तालुका खरेदी-विक्री संघांचे अध्यक्ष मंगेश खिलारी, यांच्या मार्गदर्शना खाली काम करत असताना सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन वारंवार विकासकामांची मागणी

सरपंच प्रिया आणि उपसरपंच दत्तात्रय डावखर व ग्रामपंचायत सदस्य यांनी विकासकामाची मागणी जुन्नर-शिवजन्मभुमी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अतुल बेनके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या कडे केली

व त्या बद्दल चा पाठपुरावा करून गावासाठी ६० लक्ष रुपये इतका विकास निधी मंजूर झाला. व या वेळी पुढील काळात जास्तीत जास्त विकास निधी आपल्या गावासाठी मंजूर करून घेऊ असा विश्वास वरील सर्व मंडळींनी दिला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे