निमगाव सावा गावच्या विकास कामांना १ कोटी ९० लक्ष रुपये निधी मंजूर

1 min read

निमगाव सावा दि.४:- आमदार अतुल बेनके व पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार निधीतून व यांच्या विशेष प्रयत्नांतून निमगाव सावा (ता.जुन्नर) गावचे सरपंच किशोर घोडे यांच्या पाठपुराव्यातुन गावात १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या मध्ये निमगाव सावा रा.मा. ११२ ते श्रीराम हेअरी रस्ता करणे (४० लाख), स्मशानभूमी निवारा शेड करणे (१० लाख), दभनभुमी परिसर सुधारणा करणे (१० लाख), निमगाव सावा श्रीराम मंदिर रस्ता ते एकनाथ काटे वस्ती रस्ता करणे (०५ लाख), खंडोबा मंदिर रस्ता करणे (२० लाख), निमगाव सावा ते जाधववाडी रस्ता करणे (२० लाख). निमगाव सावा ते पाचपडाळ रस्ता करणे (२० लाख), हायम्याक्स दिवे बसविणे (१० लाख), निमगाव सावा प्र.जि. मा. ९. ते नेपाळी रस्ता करणे (५ लाख), घोडेमळा शेंबेपडीक रस्ता करणे (१० लाख), निमगाव सावा रा.मा.११२ ते पवार वस्ती रस्ता करणे (१० लाख), खामगाव पवार वस्ती रस्ता करणे. (०५ लाख), मिना शाखा कालवा ते रूतनी डोंगर रस्ता करणे (१० लाख), निमगाव सामा प्र. जि. मा. ९ ते चिमाजी गाडगे वस्ती रस्ता करणे (५ लाख), स्मशानभूमी परिसर सुधारणा करणे (१० लाख) असा एकूण १ कोटी ९० लक्ष रू निधी मंजूर झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे