शिक्षकांना अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापनावर मार्गदर्शन

1 min read

खेड ता.१७ अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापन (Management of Learning intervention) या विषयावर प्रशिक्षण सध्या नवसह्याद्री विद्यालय चाकण येथे दिनांक १६/१/२४ ते २०/१/२४ या कालावधीत सुरू आहे. प्राथमिक शिक्षकांना या माध्यमातून या विद्यालयात कुल क्रमांक ४ मध्ये अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापन, वाचन साहित्य, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आज या प्रशिक्षण कालावधीत आंतरराष्ट्रीय दर्जाची व गुणवत्ता पूर्ण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी चे मुख्याध्यापक दत्ता वारे गुरूजी यांनी भेट दिली व शिक्षकांना नवीन पिसारेडी या आधुनिक शिक्षण पद्धतीचे मार्गदर्शन केले. यासाठी खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शिका कल्पना टाकळकर केंद्र प्रमुख खेड, तज्ञ मार्गदर्शक गणेश मिसाळ, जि.प.शाळा.खराबवाडी, बाळासाहेब मुंडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निशाण वाडी मार्गदर्शन करणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे