सह्याद्री व्हॅली कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर सुरु

1 min read

राजुरी दि.१७:- राजुरी (ता.जुन्नर) येथील सह्याद्री व्हॅली कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या अंतर्गत कॅम्प जुन्नर तालुक्यातील उंब्रज क्र.1 या गावात दाखल झाला. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत गावचे सरपंच हिरामण शिंगोटे तसेच ग्रामस्था मार्फत करण्यात आले. सदरील योजनेअंतर्गत विद्यार्थी उंब्रज गावात ७ दिवस राहणार असून यादरम्यान ते गावसेवा करणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टी सचिन चव्हाण तसेच उपप्राचार्य पी. बालारामूडू उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना महारिया चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व संचालकांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे