समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये माजी सैनिकांचा तिळगुळ समारंभ
1 min read
बेल्हे दि.१६:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेल्हे व समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजने मार्फत जुन्नर तालुका माजी सैनिकांचा तिळगुळ समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जुन्नर तालुका माजी सैनिक संघाचे अध्यक्ष दिलीप आरोटे, माजी अध्यक्ष देविदास भुजबळ, उपाध्यक्ष कॅप्टन महादेव हाडवळे, सचिव दामोदर घोलप, खजिनदार बाळासाहेब मुळे, सदस्य गोपीनाथ कुटे, सतीश भुजबळ, ज्ञानदेव थोरवे, सुधीर खेबडे, गोपीनाथ कसाळ, शिवाजी चौधरी, आनंद खुटाळ, विलास जाधव, ॲडव्होकेट संजय शेटे आदि माजी सैनिक उपस्थित होते.
तिळगुळ समारंभ प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना जुन्नर तालुका माजी सैनिक संघाचे माजी अध्यक्ष देविदास भुजबळ म्हणाले की तिळगुळ समारंभाचे औचित्य साधून माजी सैनिक संघातील सर्व सदस्यांना संकुलामध्ये आदराने आमंत्रण दिल्याबद्दल मनातील गोडवा अधिकच वाढलेला आहे.
यावेळी पानिपत मधील लढाईचा इतिहास सांगत आपल्या परंपरा, संस्कृतीचे जतन यांसारख्या कार्यक्रमातून होत असल्याचे देविदास भुजबळ यावेळी म्हणाले. कॅप्टन महादेव हाडवळे यांनी देखील मनोगत व्यक्त करत आपापसातील मतभेद विसरून सर्वांना एकत्रित करण्यासाठी तिळगुळ समारंभ महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
संस्थेच्या वतीने अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी सर्व माजी सैनिकांना तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच सेवेत कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत.
त्यांच्यामुळेच आज देश सुरक्षित असल्याचे आणि सामान्य नागरिक घरी राहून अगदी आनंदात जीवन व्यतीत करत असल्याचे उद्गार यावेळी संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी काढले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदिप गाडेकर यांनी, प्रास्ताविक डॉ.लक्ष्मण घोलप यांनी तर आभार बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार यांनी मानले.