जेष्ठ नागरिक संघाकडून कापडी पिशवी वाटप

1 min read

खामुंडी दि.३:- खामुंडी (ता.जुन्नर) येथील जेष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दीना निमित्ताने सत्यनारायण महापूजा, भजन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदस्यांना प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करून महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष गोविंद बोडके यांनी दिली. या वेळी माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या पत्नी मंदाकिनी दांगट, सरपंच वनराज शिंगोटे, जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक बनू बोडके, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मारुती शिंगोटे, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा भोर, सत्यवान डुंबरे, सामाजिक कार्यकर्ते नितीन शेलार. माळवे, भरत घोलप, जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम बोडके यांनी केले तर आभार अशोक कुसाळकर यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे