राजुरीच्या अंजना स्टडी सेंटर चा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
1 min readराजुरी दि.२:- अंजना स्टडी सेंटर (कोचिंग क्लासेस) राजुरी येथे दि. ३० रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.या समारंभात गेली २० वर्षे मुंबई विभागात शिक्षण संस्थेत नावाजलेले कोचिंग क्लासेस चे संचालक अनिल रामचंद्र कदम व प्राचार्य रूपाली अनिल कदम यांनी गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या.निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा या प्रत्येक स्पर्धेत त्यांनी वयोगटानुसार उत्कृष्ट स्पर्धक अशी एकूण ९ बक्षीसे दिली. कल्याणी विजय कदम, बुशरा इकबाल सय्यद, अहेमदी हारूण पटेल, रणजीत अनिल कदम, श्रवण राजकुमार औटी, आद्य दत्तात्रय मोरे, ओम संदिप औटी, श्रेया संतोष काळे हे विद्यार्थी या ९ बक्षीसांचे मानकरी ठरले.गायन स्पर्धेत उत्कृष्ट गायक म्हणून सार्थक महेन्द्र हाडवळे आणि कल्याणी विजय कदम यांना बक्षीसे दिली. नृत्य स्पर्धेत उत्कृष्ट नर्तक म्हणून आरूष शैलेश सोनवणे आणि अहेमदी हारूण पटेल यांना बक्षीसे दिली.गुणवंत विद्यार्थी म्हणून रणजीत अनिल कदम (९४%), स्वरा गणेश हाडवळे (९२%), अथर्व राजकुमार औटी (९२%), अहेमदी हारूण पटेल (९१%) यांचा बक्षीस देऊन सत्कार केला.क्लासमध्ये प्रवेश घेतल्यानंतर टक्केवारी वाढलेल्या एकूण १२ विद्यार्थ्यांचा बक्षीसे देऊन सत्कार केला. टक्केवारी वाढलेले विद्यार्थी; कार्तिक निलेश सोनवणे (२२% ने वाढ), सार्थक महेन्द्र हाडवळे (२० % ने वाढ), अथर्व राजकुमार औटी (१६ % ने वाढ), मयुर रामदास कणसे (१५% ने वाढ), समर्थ संतोष हाडवळे (१४ % ने वाढ). श्रेया संतोष काळे (११% ने वाढ), श्रेया सुरेश वांगर (११ % ने वाढ), रूद्र शैलेष सोनवणे (९% ने वाढ), समीक्षा निलेश सोनवणे (८% ने वाढ), श्रवण राजकुमार औटी (६% ने वाढ), सुयश विजय कदम (५ % ने वाढ), ओम संदिप औटी (५ % ने वाढ) आहेत.आदर्श विद्यार्थी म्हणून वयोगटानुसार स्वरा गणेश हाडवळे व सई अविनाश हाडवळे या दोन विद्यार्थ्यांचा वक्षीसे देऊन सत्कार केला.समारंभात संचालक अनिल कदम आणि प्राचार्य रूपाली कदम यांना पालकांनी शाल, नारळ आणि रोख रक्कम बक्षीस म्हणून तर विद्यार्थ्यांनी भेट वस्तू देऊन सन्मानित केले.प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत आय डी कार्ड व मोबाईल मध्ये स्टडी व रेकॉर्ड असलेले प्रत्येकाच्या लॉगिन, पासवर्ड चे स्वतंत्र मोफत अॅप आणि १००% हमखास प्रगतीची खात्री देणा-या या अंजना स्टडी सेंटर कोचिंग क्लासेसमध्ये नर्सरी ते १० वी (सर्व माध्यम), ११ वी व १२ वी (सायन्स) आणि इंग्रजी स्पीकिंग कोर्स चे शिक्षण उत्कृष्ट रित्या शिकवले जाते.पुढील काही दिवसातच हा कोचिंग क्लास विज्ञान प्रदर्शन हा उपक्रम राबवणार आहे.