गुळुंचवाडीत बालचमुंनी भरवला ‘आनंदी बाजार’

1 min read

गुळूंचवाडी दि.१:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळूंचवाडी येथे ‘बालआनंद मेळावा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या बालआनंद मेळाव्याचे उदघाट्न उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते जालिंदर देवकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. आनंदी बाजारामध्ये शाळेतील चिमुकल्यांनी आपल्या शेतातील भाजीपाला, फळे, पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य तसेच विविध खाण्याच्या पदार्थ्यांचे स्टॉल लावले होते.

विद्यार्थ्यांचे पालक, गावातील ग्रामस्थ, शिक्षक यांनी विविध वस्तूंची खरेदी करून चिमुकल्यांच्या उत्साहाला उदंड प्रतिसाद दिला. या आनंदी बाजारातून विद्यार्थ्यांनी सुमारे पंधरा हजार रुपयांची उलाढाल केली. यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात बीटस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या पन्नास विद्यार्थ्यांना उद्योजक जालिंदरशेठ देवकर यांनी वीस हजार रुपये किमतीचे स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले.

त्याबद्दल त्यांचा शाळेच्या तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने माजी सरपंच वैशाली गुंजाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ भांबेरे व शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुऱ्हाडे यांच्या हस्ते सत्कार करून आभार मानण्यात आले.शाळेचे उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना या वर्षीचा पंचायत समितीचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तालुकास्तरीय कला क्रीडा महोत्सवात सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा व वक्तृत्व स्पर्धेत नैपुण्य मिळवलेल्या गौरी देवकर, मयांक भांबेरे व सार्थकी शिंदे यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्हावे, गणितीय क्रियांचा सराव व्हावा, शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव व्हावी, नाणी व नोटांच्या ओळख व्हावी , प्रत्यक्ष व्यवहारज्ञानाचा जीवनात उपयोग व्हावा. नैतिक मूल्यांची जोपसना व्हावी या व्यापक उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुऱ्हाडे यांनी सांगितले.

हा उपक्रम कौतुकास्पद आहे. बाजार पाहून बालपणी पाहिलेल्या बेल्हे बाजाराची आठवण झाली. यातून विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्ये रुजण्यास मदत होईल,यापुढे शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहकार्य करण्यास आपण सैदव कटीबद्ध राहू असे प्रतिपादन उद्योजक जालिंदर देवकर यांनी केले.

या अभिनव उपक्रमाबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले. या आनंदी बाजारास सरपंच अतुल भांबेरे, उपसरपंच शांताराम गुंजाळ, मा. सरपंच वैशाली गुंजाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रंगनाथ भांबेरे, उपाध्यक्ष चंचल गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य विजय गुंजाळ, बबन काळे, सुषमा भांबेरे, प्रीती शिंदे, विजय काळे, दत्ता गुंजाळ, विठ्ठल खिलारी.

दत्तात्रय भांबेरे, अनिल गुंजाळ, जिजाभाऊ काळे, विठ्ठल गुंजाळ, अनिल बांगर, बबन गुंजाळ, किसन मधे, दिपक जाधव, लक्ष्मण गुंजाळ, नरेश भांबेरे, दिलीप जाधव, भाऊसाहेब काळे, सुरेखा गुंजाळ, अशोक बांगर सरिता मटाले, ज्ञानेश्वर जाधव, ज्योती फापाळे, नरजहाँ पटेल तसेच माता पालक, सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जाधव यांनी केले, मुख्याध्यापिका सविता कुऱ्हाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले तर अशोक बांगर यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे