आळेफाटा येथे शेतकरी आक्रोश मोर्चा; शेतकरी आक्रमक 

1 min read

आळेफाटा दि.२७:- विविध मागण्या सरकारकडे पोहोचव्यात व शेतकरी वर्गाला न्याय मिळावा या मागणीसाठी आळेफाटा मुख्य चौकात शेतकरी आक्रोश मोर्चा शिवनेरी किल्ला, जुन्नर, ओतूर मार्गे आळेफाटा या ठिकाणी दाखल झाला.

त्यानंतर नारायणगाव कळंब मार्गे इंदापूर, दौंड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय आळेफाटा याठिकाणी सांगता होणार आहे. कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवावी, खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, बिबटप्रवण क्षेत्रात अखंडित वीज पुरवठा,

पीकविमा कंपन्याकडून नुकसान भरपाई तातडीने मिळावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी नवे पिक कर्ज तातडीने मिळावे व शेतकऱ्यांच्या मुलांना निश्चित स्वरूपाचे ‘शैक्षणिक कर्ज’ धोरण लागू व्हावे या आग्रही मागण्या आहेत.

यावेळी मुख्य चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळ्यास संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे ह्यांच्या हस्ते पुष्पहार घालून सरकारविरोधात घोषणाबाजी करत शेतकरी एकजुटीचा विजय असो, रडायचं नाही लढायचं अश्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापु शेवाळे, उध्दव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख दिलीप बाम्हणे, उपजिल्हाप्रमुख सुरेश भोर, तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य तुषार थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनंतराव चौगुले,

शिवसेना उपतालुका प्रमुख माऊली खंडागळे, ॲड.विजय कु-हाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके, मंगेश आण्णा काकडे, जयवंत घोडके, शरद अण्णा चौधरी, गोमाता पतसंस्था अध्यक्ष सुरेश भिमाजी गडगे, निलेश शिंदे, गणेश गुंजाळ, रविंद्र गुंजाळ, सुरेखा वेठेकर, वडगाव आनंद उपसरपंच ऋषिकेश गडगे,

वडगाव आनंद विविध कार्यकारी सोसायटी उपाध्यक्ष प्रमोद गडगे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गडगे, बारकू गडगे, माजी उपसरपंच सुरेश शिंदे आदी मान्यवर ग्रामस्थ, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये दाखल झाले.

यावेळी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनंतरावं चौगुले व विघ्नहर सहकारी साखर कारखाना चेअरमन सत्यशील शेरकर यांनी मनोगत व्यक्त केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे