ॲड. काळेंमुळे शेतकऱ्यांना ६ हजार कोटींची कर्ज माफी; औरंगाबाद खंडपीठातील लढाईला आले यश

1 min read

बेल्हे दि.२२:- राज्य शासनाने २८ जून२०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमुक्ती योजना अमलात आणून सदर योजनेप्रमाणे २०१६ रोजी थकीत असलेल्या मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपये कर्जमाफी देऊ असे जाहीर केले होते . परंतु देवेंद्र फडवीस मुख्यमंत्री असताना राष्ट्रीयअध्यक्ष रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचा शेतकरी संप आंदोलनामुळे कर्जमाफी जाहीर केली होती.

मात्र अंमलबजावणी करताना ५ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला नव्हता. या विरोधात शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲड.अजित काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने कर्जमाफी करण्यात आदेश दिला होता.

परंतु शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नव्हती त्यामुळे ॲड.काळे यांनी अवमान याचिका दाखल केली शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून आघाडी शेतकरी संघटनेचे जुन्नर तालुकाध्यक्ष व स्वामी समर्थ सेवेकरी प्रमोद खांडगे यांनी श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्र नारायणगावचे प्रमुख बाळासाहेब पाटे व याज्ञिकी बापूसाहेब आढाव यांच्याकडून सर्वसामान्य जनतेची कर्जमुक्ती व शेतीचे कर्जमुक्तीसाठी सेवा मागितली होती.

त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेपासून ते दत्त जयंती पर्यंत नवनाथांचे नऊ पारायणे करावे अशी सेवा दिली होती ५५ सेवकरी पारायणाला बसले होते ह्या कालावधीत ५०० श्री नवनाथ पारायण पूर्ण झाली. सेवेकरी यांना व शेतकऱ्यांना न्याय मिळाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे