दरोडा टाकून पळून जाताना नागरिकांनी टोळीतील एका चोरट्याला पकडले
1 min readशिक्रापूर दि.२२:- शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथे मध्यरात्रीच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी दरवाजाचे कडी कोयंडे तोडून घरात प्रवेश करुन महिलेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत गळ्यातील दागिने हिसकावून नेऊन दुसऱ्या घरावर दरोडा टाकत असताना ग्रामस्थांनी पाठलाग करुन एकाला पकडले. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप पंडित भोसले (रा. कोळगाव जि. नगर)याच्या सह त्याच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.सुमित दरेकर यांचे कुटुंब घरात झोपलेले असताना रात्री पाच दरोडेखोर कडी कोयंडे तोडून घरात आले. त्यांनी हिराबाई दरेकर यांना मारहाण केली.
त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा केला. यावेळी हिराबाई यांनी आरडाओरडा केल्याने सर्वजण जागे झाले. मात्र, शेजारी पोपट उमाप यांच्या घरात चोरट्यांनी मोर्चा वळवला असताना उमाप कुटुंबीय जागे झाले. त्यावेळी घरातून ओरडण्याचा आवाज आल्याने सर्वजण तिकडे गेले. मात्र उमाप यांच्या घरातून चोरटे पळून जाताना एकाला पकडले.