मीना कालवा पाणी संस्थांची आढावा बैठक निमगाव सावा येथे संपन्न

1 min read

निमगाव सावा दि.७:- मीना शाखा कालव्यावर कालवा स्वच्छतेची पहाणी /श्रीकृष्ण पाणी वापर संस्था क्र.२६ औरगंपुर/ पारगाव या संस्थेच्या ऑफीस मधील दप्तर तपासणी तसेच आढावा बैठक या निमित्ताने. हेमंत धुमाळ मुख्य अभियंता,

प्रशांत कडुसकर कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ नारायणगाव तसेच किरण देशमुख कार्यकारी अभियंता विभाग क्र.२ श्रीगोंदा मीना शाखा कालव्याचे अध्यक्ष व घोड व कुकडी कालवा सल्लागार समिती सदस्य प्रकाश वायसे यांच्यासह पाटबंधारे विभागातील अनेक मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

सदरची आढावा बैठक त्रिगुणात्मक मगंल कार्यालय निमगाव (ता. जुन्नर) येथे पार पडली. आढावा बैठकीसाठी २३ पाणी वापर संस्थाचे सर्व संचालक व शेतकरी बाधंव उपस्थित होते.

मीना शाखा कालव्या वरील सर्व संस्थाचे कामकाज उत्कृष्ट असुन भविष्यात मीना शाखा कालवा एक आदर्श कालवा असेल असे गौरव उद्वगार ३५० संचालक व सभासदा समोर बोलतांना धुमाळ साहेबांनी व्यक्त केले.

संस्थाना आवश्यक ते व मला शक्य असणाऱ्या सर्व बांबीची पुर्तता मी मीना शाखा कालव्या वरील सर्व संस्था साठी निच्छीतच करील आशी ग्वाही कार्यकारी अभियंता कडुसकर यांनी दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल डुकरे यांनी केले तर प्रस्ताविक श्रीकृष्ण पा.वा. संस्थेचे अध्यक्ष सुभाष झिंजाड यांनी केले. मीना शाखा कालव्याचे अध्यक्ष प्रकाश वायसे यांनी सर्वाचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे