शेतीसाठीच्या वस्तूंवर जीएसटी नको : आमदार अतुल बेनके
1 min readजुन्नर दि.९:- शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाही. शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंसाठी शेतकऱ्याला जीएसटी मोजवा लागत असल्याने शेतकरी अधिक अडचणीत येत आहे. शासनाने शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंवरील जीएसटी माफ करावा, अशी मागणी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली.
अर्थमंत्री अजित पवार यांनी बेनके यांची मागणी शासन स्वीकारीत असल्याचे सभागृहात सांगितले. शेतातील पीक तोट्यात गेले तरी पुढच्या पिकात पैसे होतील या आशेने शेतकरी पुन्हा नवीन पिकाची तयारी करतो.
यासाठी खते, औषधे, त्याचबरोबर शेतीसाठी लागणारी इतर साहित्य घेताना जीएसटीचा मोठा खर्च येतो. हा सगळा खर्च शेतकऱ्याला करणे शक्य नसते, त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंवर राज्य सरकारने जीएसटी लावू नये, अशी मागणी आमदार अतुल बेनके यांनी सभागृहात केली.
त्यांच्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दुजोरा दिला व आमदार महोदयांनी केलेली मागणी सरकार स्वीकारीत असल्याचे सभागृहाला सांगितले.