श्री रेडा समाधी मंदिर आळे ते आळंदी पायीवारी पालखी मार्गस्थ

1 min read

आळे दि.४:- आळे (ता.जुन्नर) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवलेल्या श्री रेडा समाधी मंदिराच्या श्री क्षेत्र आळे ते श्री क्षेत्र आळंदी कार्तिकी पायीवारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान सोमवार दि.४ रोजी झाले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांणी वेद बोलविलेल्या रेडा समाधी आळे या ठिकाणी असुन गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणाहून दरवर्षी श्री क्षेत्र आळे ते श्री क्षेत्र आळंदी कार्तिकी वारी निघत असते.

याही वर्षी अतीशय उत्साहात हा दिंडी सोहळा पार पडत असुन प्रस्थानाची महापुजा विनेकरी ह.भ.प. रामदास महाराज सहाने, दिपक टकले व श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष संदीप निमसे यांच्या हस्ते करण्यात आली.

या प्रसंगी ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कु-हाडे, देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष निलेश भुजबळ, सचिव अविनाश कु-हाडे, खजिनदार अमोल भुजबळ, धनंजय काळे, प्रसन्न डोके, कान्हू पाटील कु-हाडे, विलास शिरतर, संतोष कु-हाडे,

जीवन शिंदे, म्हतु सहाने, पांडुरंग डावखर, संजय गाढवे, सुनिल जाधव, गणेश शेळके, संदिप पाडेकर, होनाजी गुंजाळ, ज्ञानेश्वर गाढवे, दिनकर राहिंज, संतोष डावखर, पालखी सोहळा प्रमुख अरूण गुंजाळ, पालखी सोहळ्याचे व्यवस्थापक नागेश कु-हाडे, राजेंद्र धोंगडे,

गिरीश कोकणे आळे गावचे माजी सरपंच दिपक कु-हाडे, गणेश गुंजाळ, प्रदिप गुंजाळ, मुकूंद भंडलकर आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे