कै. आ. कृष्णराव मुंढे भूषण पुरस्काराने देवराम लांडे सन्मानीत

1 min read

जुन्नर दि.२७ (प्रतिनिधी- सतिश शिंदे) – जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आदिवासी शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षण महर्षी कै. आ. कृष्णराव मुंढे यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्ताने रविवार दिनांक २६ डिसेंबर २०२३ रोजी आदिवासी शिक्षण संस्था, जुन्नर कृष्णराव मुंढे हायस्कूल येथे पुरस्कार व सन्मानपत्र वितरण सोहळ्याचे या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते.

या वेळी पुरस्कारार्थी देवराम सखाराम लांडे मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे (आदिवासी वादळ) यांना हा पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल वल्लभ बेनके जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पुरस्कारावेळी अलका देवराम लांडे, अमोल देवराम लांडे, दिपक देवराम लांडे हेदेखील उपस्थित होते.

तसेच आदिवासी शिक्षण संस्था विशेष पुरस्कार राजश्री बोरकर मा. संचालक, पी. डी. सी. सी. बॅंक व शकुंतला देवका मोरे लोकनियुक्त सरपंच खटकाळे यांना देण्यात आले.

यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, गणपत फुलवडे मा. उपाध्यक्ष जि. प. पुणे, जुन्नर, माजी आमदार बाळासाहेब दांगट व तालुक्यातील लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच व आजी माजी पदाधिकारी, अधिकारी तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी संस्थेच्या सर्व शाखा, आदिवासी भागातील सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, आदिवासी भागातील सर्व लेझीम पथक, सामाजिक कार्यकर्ते व सर्व आदिवासी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संचालक मंडळातील मा. देवराम मुंढे सचिव, मा. संचालक – कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर मा. सरपंच ग्रामपंचायत राजूर, सुरेखाताई मुंढे तळपे अध्यक्षा मा. सदस्या जिल्हा परिषद, पुणे. लक्ष्मीताई मुंढे विश्वस्त सर्व संचालक मंडळ व सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे