राजुरीत किल्ले बनवा स्पर्धेत जान्हवी औटी व विघ्नहर्ता ग्रुपचा प्रथम क्रमांक

1 min read

राजुरी दि.२१:- राजुरी (ता.जुन्नर) येथील जनता विकास मंडळ राजुरी संचलीत. विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरी यांच्या वतीन भव्य किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान जुन्नर येथील किल्ले शिवनेरी या ठिकाणी असुन तालुक्यात व आसपासच्या भागांमध्ये भरपूर किल्ले आहेत व विविध किल्ल्यांची माहिती शालेय विद्यार्थ्यांणा व्हावी यासाठी दिपावली घ्या सुट्टीमध्ये हि स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.

यामध्ये प्रथम क्रमांकांचे ६ हजार रुपयांचे बक्षीस जानव्ही संतोष औटी ( सिंधुदुर्ग ) व विघ्नहर्ता ग्रुप आबाटेक ( जंजिरा ) यांच्यात विभागुन देण्यात आले तर द्वितीय क्रमांकाचे ५ हजार रुपयांचे बक्षीस वेदांत सुनील औटी ( पद्मदुर्ग ) प्राप्ती प्रमोद औटी ( पन्हाळा यांच्यात विभागुन दिले.

तृतीय क्रमांकाचे ४ हजार रुपयांचे बक्षीस आर्यन मुकेश गुंजाळ ( शिवनेरी ). सार्थक सचिन गटकळ ( पन्हाळा )यांणा देण्यात आले. तर चतुर्थ क्रमांकचे ३ हजार रुपयांचे बक्षीस साहिल सुरेश लेंडे ( सिंहगड ), कुणाल भानुदास हाडवळे आणि संकेत कैलास औटी ( सिंधुदुर्ग )यांणा देण्यात आले.

व पाचव्या क्रमांकाचे २१०० रुपयांचे बक्षीस अनुष्का गणेश घंगाळे ( पन्हाळा ) व कुणाल शरद दुधावडे ( प्रतापगड ) यांच्यात विभागुन देण्यात आले.सर्व विजेत्यांणा शरदचंद्र पतसंस्था राजुरी, आदर्श महिला पतसंसंस्था राजुरी, वसंतराव नाईक पतसंस्था, ज्ञानदीप पतसंस्था विवीध कार्यकारी सोसायटीचे संचालक वल्लभ शेळके, सचिन हाडवळे, डॉ.गणेश घंगाळे यांच्या वतीने रोख बक्षीसे व ट्रॉफी देण्यात आली.

या स्पर्धेत एकूण ८० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.अनेकांनी किल्ले बनविण्यासाठी घेतलेली मेहनत लक्षात घेता जास्त जणांना सामावून घेण्यासाठी क्रमांक विभागून देण्यात आले. पर्यवेक्षक म्हणुन प्राचार्य जी.के.औटी, हरिश कोकाटे, राजेंद्र गाडेकर यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे