मुरबाडचा मिमिक्री मॅन गणेश देसले ५० पेक्षा जास्त प्रसिद्ध व्यक्तींचे काढतो हुबेहूब आवाज

1 min read

मुरबाड दि. १८:- ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामधील एकलहरे गावातील एक मिमिक्री कलाकार चांगलाच लोकप्रिय आहे. गणेश देसले मिमिक्री मॅन अस या हरहुन्नरी कलाकाराचं नाव आहे.मुलचा एकलहरे गावचा असलेला गणेश 50 पेक्षा जास्त प्रसिद्ध व्यक्तींचे हुबेहूब आवाज काढतो मिमिक्री क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवण्याच ठरवलं गणेश ने मिमिक्री क्षेत्रामध्ये खूपच मेहनत घेतली आणि या प्रवासाला सुरुवात केली.

आवाजात स्पष्टता आणि लवचिकता अभिनय कौशल्य तांत्रिक ज्ञान वाचन प्रवाह अशा सगळी आवश्यक कौशल्य त्यांनी शिकली . गणेश अनेक राजकीय सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम करतो. गणेशला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत आणि मोठमोठ्या कलाकारांसोबत गणेश कार्यक्रम कार्यक्रम करत असतो .

आपल्या आवाजाने प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. शरद पवार राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे अजित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी. अभिनेते मकरंद अनासपुरे दादा कोंडके, निळू फुले, सयाजी शिंदे (अक्षय कुमार, लक्ष्मीकां बेर्डे अशोक सराफ, जॉनी लिव्हर महाराष्ट्राची गाणं कोकीला लता मंगेशकर ,आनंद शिंदे ,

आदर्श शिंदे, स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे , सुनील शेट्टी, नाना पाटेकर ऋतिक रोशन, रितेश देशमुख राजकुमार , विजयराज, हभप निवृत्ती महाराज देशमुख अमिताभ बच्चन तसेच चला हवा येऊ द्या निलेश साबळे भाऊ कदम यांची मिमिक्री अफलातून गणेश करतो यांच्यासह अशा 50 दिगजांची गणेश मिमिक्री करतो.

या मिमिक्रीसाठी त्याला चांगलीच मेहनत घ्यावी लागते. चांगल्या आवाजातील अभिनयासाठी खूप मेहनत संयम जिद्द आणि चिकाटी आवश्यक आहे. मिमिक्री म्हणजे पानावरचे शब्द वाचणे नाही. त्यासाठी उत्तम अभिनय कौशल्य देखील लागतं.

अभिनय कौशल्य असेल तर तुम्हाला अधिक आत्मविश्वास येतो आणि तुमची कला इतरांपर्यंत लवकर पोहोचते असा अनुभव गणेशने सांगितला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे