पारनेर तालुक्याला गारपिटीचा जबर तडाखा 

1 min read

पारनेर दि.२७:- पारनेर तालुक्यात गारपीट व अवकाळी वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे ज्वारी, कांदा ही पिके भुईसपाट झाल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. पारनेरसह पानोली, सांगवी, सूर्या, जवळा, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगण, थेरपाळ, पिंपळनेर, गुणोरे, गांजीभोयरे या ठिकाणी गारपीट झाली.

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच फळबागा व फुलशेतीचे नुकसान झाले. पारनेर तालुक्यात सुरुवातीला कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पेरणीला विलंब झाला होता.

त्यामुळे पहिले पीक वाया गेले होते. त्यानंतर पेरणी झाल्या. त्यात ज्वारी, कांदा, गहू, हरभरा या पिकांना गारपिटीने झोडपले. काही शेतकऱ्यांचा कांदा काढणीला आलेला आहे.

हा कांदा पूर्ण भुईसपाट झाला आहे. वादळाचा शेतकऱ्यांच्या शेतातील, पालेभाज्या, डाळिंब, संत्रा, पेरू, सिताफळ आदी फळबागांना देखील फटका बसला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे