ऊसाच्या शेतात आढळला बछडा मृतावस्थेत
1 min read
आळेफाटा दि.२७:- आळे येथे ऊसाच्या शेतात आढळला मृतावस्थेत बिबटयाच्या बछडा अढळून आला.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आळे (ता.जुन्नर) येथील दक्षिण लवणवाडी रहात असलेले ज्ञानेश्वर तबाजी कु-हाडे यांचे ऊसाचे पीक
असुन त्यांना ऊसाच्या शेतातील दोन दिवसांपासुन दुर्गंधी येत असल्याने त्यांनी स्थानिकांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनी रविवार दि. २६ रोजी ऊसाच्या शेतात जाऊन पाहिले असता त्यांना त्या ठिकाणी एक बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळलेला दिसला.
याबाबतची माहिती वन अधिका-यांना दिल्यानंतर घटनाथळी वनविभागाचे अधिकारी कैलास भालेराव यांनी येऊन पंचनामा केला असुन मृत बिबट्याचा बछडा हा अंदाजे चार ते पाच महिन्यांच्या वयाचा असुन त्यास शवविच्छेदन करण्यासाठी माणिक डोह येथील बिबट्या निवारण केंद्रात नेहण्यात आले होते.