आळेफाटा येथे मालवाहू ट्रक आगीत जळून खाक; अग्निशमन केंद्राची मागणी पुन्हा ऐरणीवर 

1 min read

आळेफाटा दि.२४:- (वार्ताहर- मनीष गडगे) आळेफाटा येथे दि.२३ नोव्हेंबर रोजी रात्री २ च्या सुमारास सूर्यकांत शिंदे यांच्या मालकीचे ट्रक MH14 EM 9527 या गाडीने क्रमांकाचे अचानक पेट घेऊन जळून खाक झाले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदरहू मालवाहू गाडी 23 नोव्हेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास राजू बेळगावकर यांच्या गॅरेजमध्ये उभी करण्यात आलेली होती. रात्री 2 च्या सुमारास गाडी ने पेट घेतल्याच्या नंतर गॅरेज व्यावसायिक यांनी तात्काळ धाव घेतली.

पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाय जुन्नर याठिकाणाहून अग्निशमन दलाच्या गाडीस पाचरण करण्यात आले. मात्र अग्निशमन वाहन जुन्नर हुन आळेफाटा ला पोहोचेपर्यंत मालवाहू ट्रक आगीच्या भक्ष्य स्थानी पडत जळून खाक झाला.

आळेफाटा मध्ये अग्निशमन दलाची स्वतंत्र व्यवस्था असली असती तर जळीत वाहनाची दुर्घटना टाळता आली असती. आळेफाटा परिसरात गेल्या 3 वर्षांमधील ही 5 वी दुर्घटना असून आळेफाटा परिसरात मध्यवर्ती ठिकाण असल्याने अग्निशमन दलाची शासनामार्फत स्थापना व्हावी अशी आग्रही मागणी आळेफाटा परिसरातील नागरिक करीत आहे.

आळेफाटा परिसरात स्वतंत्र अग्निशमन दलाची व्यवस्था असणे अत्यंत गरजेचे आहे. पुढील काळात शासनामार्फत तातडीने अग्निशमन दलाची व्यवस्था न केल्यास मनसेमार्फत आंदोलन करण्यात येईल”. 

 – सचिन गोपीनाथ गडगे, मनसे आळेफाटा शहराध्यक्ष

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे