कल्याण – नगर महामार्गावर तिहेरी अपघात; दोन ठार

1 min read

ओतूर दि.१७:- कल्याण – नगर महामार्गावर तिहेरी अपघात होऊन दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे.

पीकअप टेम्पोला वेगात ओव्हरटेक करताना समोरून आलेल्या एसटी बसला दुचाकीने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर दुसरा दुचाकीस्वार रुग्णालयात पोहचताना मृत झाला आहे.

दुचाकीस्वारापैकी एक हिवरे (ता.जुन्नर) तर दुसरा घारगाव (ता. अकोले) येथील असल्याची माहिती मिळाली आहे. ओंकार गाडेकर (रा. घारगाव, ता. अकोले, जि. अहमदनगर) हे मृत्युमुखी पडलेल्या दुसऱ्या युवकाचे नाव आहे.

हा भीषण अपघात ओतूर (ता. जुन्नर) हद्दीतील नगर कल्याण महामार्गावर कोळमाथा येथे आज (दि.१७) सकाळी सव्वा अकरा वाजता घडला असून दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात पीकअप टेम्पो उलटला असून टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेची खबर मिळताच ओतूर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे