विजेच्या धक्क्याने वायरमनचा दुर्दैवी मृत्यू ; दिवाळीत पिंपळवंडीत घडली दुर्घटना

1 min read

आळेफाटा दि.१२:-ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील काकडपट्टा शिवारात महावितरणच्या रोहित्रावर काम करीत असताना संदेश नवले (वय ३० रा. कुरण, तालुका जुन्नर) या तरुण वायरमनचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी दि.१२ सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

या घटनेसंदर्भात अधिक समजलेली माहिती अशी की, संदेश नवले हे वायरमन काल सायंकाळी पिंपरी पेंढार रस्त्यालगत काकडपट्ट्यानजीक असलेल्या रस्त्याजवळील विद्युत रोहित्रावर काम करीत होते.

हे काम काम करीत करण्यापूर्वी त्यांनी रोहित्राच्या लिंक पाडून ठेवल्या होत्या मात्र काम सुरु असतानाच अचानक वीज पुरवठा सुरु झाल्यामुळे त्यांना विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू आला.

ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने नवले कुटुंबिय व त्यांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला या दुर्घटनेची माहिती समजतच महावितरण कंपनीचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे