राजुरीत बेदम मारहाण करून चोरटयांनी दागिने रोख रक्कम लुटली; एकाच रात्री ३ घरांत चोरी  

1 min read

राजुरी दि.८:- राजुरी येथे चोरटयांनी तीन घरे फोडुन‌  एका घरातील वृध्द महिलेस काठीने ने मारहाण करून तिचे अडीच तोळे दागिने व २८ हजार रुपयांची रोख रक्कम  चोरून नेली.

बाबत आळेफाटा पोलीस स्टेशनकडुन मिळालेल्या माहितीनुसार राजुरी (ता.जुन्नर) येथील उपळी मळ्यात रहात असलेल्या सुनंदा सदाशिव नायकवडी या वृध्द महिला एकट्या घरात रहात असुन बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चार ते पाच चोरटयांनी घराचा दरवाजा तोडुन आतमध्ये प्रवेश केला.

घरात असलेल्या कपाटाचा दरवाजा उघडत असताना आवाज आल्याने झोपलेल्या सुनंदा नायकवडी यांना जाग आली असता आरडाओरड करण्यास सुरुवात केली असता चोरट्यांनी लगेच महिलेचे तोंड दाबत गळ्यात व कानात असलेले दागिने काढुन दे सांगितले.

परंतु सदर महिलेने दागिणे देण्यास नकार दिला असता चोरट्यांनी त्यांना काठीने मारहान करत अंगातील अडीच तोळ्याचे  सोन्याचे दागिने व कपाटात असलेले २८ हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेली.

तसेच याच मळया शेजारील डोले मळ्यात रहात असलेले किसन डौले यांचा बंगला असुन ते काल कामा निमित्ताने बाहेर गावी गेल्याने बंगला बंद होता याचा फायदा चोरट्यांनी घेत बंगल्याचा दरवाजा तोडुन आतमध्ये असलेला एक लॅपटॉप चोरून नेला आहे.

तर जवळच रहात असलेले संतोष कणसे यांच्याही बंद घराचा दरवाजा तोडुन कपाटात असलेले १८ हजार रूपयांची रोख रक्कम व नविन कपडे चोरट्यांनी चोरून नेले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे