आमदार लंके यांच्या अटकेचा पारनेरात निषेध; तहसिलदार गायत्री सैंदाणे यांना निवेदन सादर

1 min read

पारनेर दि.२:- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकून सरकारचे लक्ष वेधणाऱ्या आ. नीलेश लंके यांच्यासह त्यांच्या सहकारी मराठा आमदारांना अटक करण्यात आल्याबददल पारनेर तालुका राष्ट्रवादी काँगे्स, नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने तहसिलदार गायत्री सैंदाणे यांना निवेदन देण्यात येउन निषेध नोंदविण्यात आला. आ. लंके यांच्यावर पुन्हा अटकेची कारवाई करण्यात आली तर तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यासंदर्भात तहसिलदार सैंदाणे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी वेगवेगळी आंदोलने, उपोषणे करण्यात येत आहेत. जालना जिल्हयातील आंतरवाली सराटी या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनास राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मंत्रालयाबाहेर लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणारे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्यासह इतर मराइा आमदारांना सरकारने अटक केली असून या बेकायदेशीर अटकेचा निषेध करण्यात येत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. आरक्षा हा आमचा हक्क असून त्याची मागणी करणे यात चुकीचे काय आहे ? असा सवाल करून मराठा आरक्षणासाठी केवळ चर्चा करून निर्णय होणार नाही तर मराठा आरक्षणासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे व या अधिवेशनात यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन तोडगा काढण्यात यावा व मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे. देशभर मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र होत असल्याचे नमुद करून आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, अर्जुन भालेकर, जितेश सरडे, अ‍ॅड. राहुल झावरे, दिपक लंके, संदीप ठाणगे, संदीप गाडेकर, डॉ. आबासाहेब खोडदे, राळेगणसिध्दीचे सरपंच जयसिंग मापारी, किसन मापारी, बाजीराव काळे, श्रीकांत डेरे, भाउसाहेब पटेकर, श्रीकांत खोडदे, महेंद्र गायकवाड, प्रविण थोरात, तुषार गाडेकर, विजय डोळ, मोहन आढाव, उत्तम नगरे, रविंद्र राजदेव, नंदकुमार देशमुख, दौलत गांगड, सचिन पठारे, भाउसाहेब भोगाडे, कारभारी पोटघन, बाजीराव कारखिले, भाऊसाहेब चौरे, प्रणय गंधाक्ते, महेश गायकवाड, बापूसाहेब भापकर, नागेश पोटे, वंदना गंधाक्ते, ऐश्‍वर्या ढोरजकर, सचिन नगरे, नगराध्यक्ष नितीन अडसूळ, योगेश मते, भूषण शेलार, भाऊ ठुबे, वैभव गायकवाड आदींच्या सहया आहेत.मनोज जरांगे हे गेल्या आठ दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. त्यांनी सरकारला दिड महिन्यांचा अल्टीमेटम दिला होता. मात्र कालावधी उलटूनही काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. आजूनही सरकार वेळ मागत आहे. आमदार नीलेश लंके यांनी मंगळवारी मंत्रालयात उपोषण केले, बुधवारी मंत्रालयास टाळे ठोकले म्हणून त्यांना अटक करण्यात आली. या अटकेचा निषेध. उपोषणास बसलेल्या बांधवांना न्याय देऊन मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे.गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे अमरण उपोषण करीत आहेत. शासनाच्या वतीने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. गेल्या तीन चार दिवसांपासून महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. आरक्षणासाठी मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. मंत्रालयात आ. नीलेश लंके यांनी त्यांच्या सहकारी आमदारांसह लाक्षणीक उपोषण केले. बुधवारी मराठा आंदोलनासाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराला त्यांनी टाळे ठोकले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे