सह्याद्री व्हॅली इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजी मध्ये नवीन विद्यार्थ्यांचे फ्रेशर्स पार्टीने स्वागत
1 min readराजुरी दि.३०:- सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयात राजुरी (ता.जुन्नर) सन २०२३/२४ या शैक्षणिक वर्षा करिता ऍडमिशन घेतलेल्या प्रथम वर्ष तसेच द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत जल्लोषात करण्यात आले.या प्रसंगी संस्थेचे ट्रस्टी सचिन चव्हाण तसेच कॉलेजचे उपप्राचार्य बालारामुडू यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध संधिसंदर्भात मार्गदर्शन केले.
सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा तसेच आशीर्वाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन या प्रसंगी केले. या वेळी सर्व संचालक मंडळींनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.