अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या जिज्ञासा-२०२३ राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेमध्ये समर्थ गुरुकुल च्या समर्थ व सार्थक चे यश

1 min read

बेल्हे दि.२८:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे (ता.जुन्नर) या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील समर्थ शेळके व सार्थक आहेर या दोन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “अनलिमिटेड जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम मुव्हिंग व्हेईकल्स ऑन नॅशनल हायवे” या प्रकल्पास राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळाल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने नुकतीच जिज्ञासा-२०२३ राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये समर्थ व सार्थक च्या प्रकल्पास राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.सध्याच्या धकाधकीच्या काळात सार्वजनिक वाहतूकीच्या ऐवजी स्वतःच्या गाडी ने प्रवास करणे पसंद करतो.त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.राष्ट्रीय नवीन महामार्ग,राज्य महामार्ग यांची संख्या,बांधकाम वाढले असून परिणामी प्रदूषणाची पातळी देखील वाढलेली आहे.कमी पावसामुळे जलविद्युत केंद्रावरील वीज निर्मितीसाठी धरणांमध्ये पाण्याची कमतरता असल्याने वीज भार नियमनाची समस्या निर्माण झालेली आहे.अशा परिस्थितीमध्ये पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा उपयोग करून मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न गुरुकुलच्या विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.अपारंपरिक साधनांद्वारे राष्ट्रीय महामार्गावर चालणाऱ्या वाहनांपासून अमर्यादित वीज निर्मिती करणे शक्य असल्याचे सांगत “सेव्ह इलेक्ट्रिसिटी सेव्ह नेशन” असा संदेश या प्रकल्पातून दिल्याचे समजते.पवन ऊर्जा,सौर ऊर्जा,पाणी यांसारख्या अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून वीज निर्मिती केली जाऊ शकते.त्याचप्रमाणे या तंत्राचा वापर करून आपण भरधाव वेगाने वाहणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वेगाचा वापर करून द्रुतगती मार्गावर असलेले सीसीटीव्ही सर्किट,पोल लाईट यासाठी वीज निर्मिती करू शकतो.ताशी ६० किमी पेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या दोन्ही चाकांमधील हवेच्या दाबाचा वापर जरून वीज निर्मिती केली जाते.तसेच स्ट्रीट लाईट चालू करण्यासाठी याचा वापर होतो.या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या प्रकल्पाचा उपयोग द्रुतगती मार्ग,राष्ट्रीय महामार्ग,रस्ता दुभाजकावर स्ट्रीट लाईट,टोल प्लाझा,वाहन चार्जिंग पॉईंट,पोलीस स्टेशन,सिग्नल्स, आपत्कालीन विभाग इत्यादी ठिकाणी केला जाऊ शकतो.सदर विद्यार्थ्यांना गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे, पर्यवेक्षक एच पी नरसुडे,आय टी आय चे विलास सोनवणे, प्रा.निर्मल कोठारी यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत तसेच संकुलातील सर्व प्राचार्य व शिक्षकांनी समर्थ व सार्थक चे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे