जुन्नर तालुक्यातील पारुंडे,पिंपरी कावळ, गुळंचवाडी, बांगरवाडी चार ग्रामपंचायत बिनविरोध
1 min readजुन्नर दि.२९:- जुन्नर तालुक्यातील निवडणूक जाहीर झालेल्या २६ ग्रामपंचायतीं पैकी पिंपरी कावळ, गुळंचवाडी, पारुंडे आणि बांगरवाडी या चार गावांमध्ये सरपंच व सर्व सदस्य बिनविरोध पद्धतीने निवडून आले आहेत. यांसह सदस्य पदांच्या एकूण ७६ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित २२ ग्रामपंचायतीं मधील १९२ ठिकाणी सदस्यपदासाठी लढाई होत आहे.
बिनविरोध निवड झालेले काही जागा व उमेदवार पुढीलप्रमाणे
बांगरवाडी : विमल जाधव (सरपंच), नीता बांगर, कविता फापाळे, अजय शेटे, सविता बांगर, मंगेश बांगर, रत्नप्रभा वाडेकर आणि मोहन बांगर
तांबेवाडी:-कविता हाडवळे, अनिल तांबे, तेजश्री बांगर, वैभव तांबे, तृप्ती तांबे आणि बाजीराव कुंजीर.
शिरोली तर्फे आळे:– सोनाली डावखर,दत्तात्रय डावखर, आणि सखुबाई काळे पिंपरी कावळ:- ज्ञानेश्वर पाबळे (सरपंच), दिपाली झिंजाड, रोहिणी भांबिरे, दत्तात्रय भोर, ठकुबाई झिंजाड, शरद पाबळे, अर्चना चक्कर, शंकर चक्कर.
गुळंचवाडी : अतुल भांबेरे (सरपंच), संजीवनी गायकवाड, स्वाती घोडके, शांताराम गुंजाळ, विजय गुंजाळ, वनिता भुतांबरे, बबन काळे, प्रकाश गुंजाळ, ऋतिका भांबेरे आणि वैशाली भांबेरे.वडगाव आनंद : रेलीका जाधव, अर्चना काशीकेदार, अल्पना देवकर, वैशाली देवकर, संदीप गडगे, कल्पना पादिर, संतोष पादिर, ऋषिकेश गडगे आणि निशा वाळुंज.
कांदळी : अनिल भोर, विनय गुंजाळ, रेश्मा फुलवडे आणि सुनीता रोकडे.पारुंडे : जयेश पुंडे (सरपंच), कार्तिकी भालेराव, विजया पुंडे, किसन जाधव, रोहिणी मोदे, हौशीराम केदार, स्वाती पवार, शितल पुंडे, मंगेश पुंडे आणि मयूर पवार