विक्रमी गर्दीसह टाकळी ढोकेश्‍वरच्या मोहोटादेवी यात्रेचे प्रस्थान; टाळ मृदुंगाचा नीनाद, फुलांची पुष्पवृष्टी करीत आमदार निलेश लंके यांचे स्वागत

1 min read

पारनेर दि.१९:- आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून सध्या सुरू असलेल्या मोहटादेवी यात्रोत्सवातील उत्साह दिवसागणीक वाढत असून गुरूवारी टाकळी ढोकेश्‍वर जिल्हा परिषद गटातील यात्रेतील चित्र त्याची प्रचिती देत होते. टाळ मृदुंगाचा निनाद, गुलाब व झेंडूच्या फुलांची वृष्टी, आ. नीलेश लंके यांच्या गाण्यावर धरलेला वृध्द महिलांनी ठेका, देवीचा महिमा व आ. लंके यांचे गुणगाण उत्सफुर्तपणे गाणाऱ्या महिला आणि यात्रेसाठीची विक्रमी गर्दी हे गुरूवारच्या यात्रेेचे वैशिष्ठ ठरले. टाकळी ढोकेश्‍वर येथील नीलेश लंके प्रतिष्ठाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टाकळी ढोकेश्‍वर येथे यात्रेच्या प्रस्थानाचे नेटके नियोजन केले होते. गटातील विविध गावांमधून आलेल्या बसेस पार्कींग केल्यानंतर खास तयार करण्यात आलेल्या व्यासपीठासमोर सर्व माता भगिनी एकत्र जमा झाल्या होत्या. तिथे वयोवृध्दांसह अनेक महिला उत्सफुर्तपणे देवीची गाणी, आ. लंके यांची गाणी गात होत्या. काही महिला गाण्यांवर ठेकाही धरत होत्या. आ. लंके यांचे आगमन झाल्यानंतर महिलांच्या उत्साहास उधाण आले. पिंपळगांव रोठा येथील बाल वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या निनादात, पुष्पवृष्टी करीत आ. लंके यांना व्यासपीठावर आणण्यात आले. यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, गेल्या सात वर्षांपासून माझ्या माता भगिनींसाठी मी मोहटादेवी यात्रेचे आयोजन करीत आहे. त्यामुळे डोक्यात कोणी राजकारण आणू नये. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी माझ्या माता भगिनींसाठी मोहटादेवी दर्शन यात्रेचे आयोजन करणार आहे. माझ्या माता भगिनी निःस्वार्थ भावनेतून प्रेम करतात. इथे आल्यानंतर वयोवृध्द माता भगिनींनी नाचत, गात केलेेले स्वागत यामुळे मी भारावून गेलो असल्याचे ते म्हणाले. गंगाराम बेलकर, शिवाजी बेलकर, बा. ठ. झावरे, अशोक कटारिया, मोहन रोकडे, बाळासाहेब खिलारी, बापू शिर्के, अ‍ॅड.राहुल झावरे, दादा शिंदे, प्रकाश गाजरे, संदीप सालके, रवी गायखे, आर. आर. राजदेव, अनिल गंधाक्ते, दत्ता निवडूंगे, नगराध्यक्ष नितीन आडसूळ, अर्जुन भालेकर, योगेश मते, डॉ. बाळासाहेब कावरे, बाळासाहेब नगरे, सुभाष कावरे आदी यांच्यासह अनेक लंके समर्थक यावेळी उपस्थित होते. मी राजकारणाचा श्रीगणेशा केला तेंव्हापासून नारीशक्तीचा मला अशिर्वाद आहे. ज्याच्यामागे नारीशक्तीचा आशिर्वाद असतो त्याला कशाचीही भिती नसते. नारी शक्तीचा मला आशिर्वाद असल्याचे सांगणाऱ्या आ. नीलेश लंके यांचेच गारूड माता भगिनींवर असल्याचे यावेळी दिसून आले. लंके यांचे आगमन होताच ज्या पध्दतीने महिलांनी त्यांचे ज्या उत्सफुर्तपणे स्वागत केले ते पाहता महिलांमध्ये आ. लंके यांच्याविषयी आत्मीयता असल्याचे जाणवले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे