आळ्यात दुसरा बिबट्या जेरबंद; माणिकडोह बिबट निवारण केंद्रात रवानगी

1 min read

आळेफाटा दि.१५:- आळे (ता.जुन्नर) बालकावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडल्याने वन विभागाने या ठिकाणी 15 पिंजरे लावले होते. या पिंजऱ्यात मंगळवार दि.१० रोजी रात्री या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते तर ८ ते ९ वर्षाचा नर जातीचा दुसरा बिबट्या रविवार दि.१४ रात्री पुन्हा दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

सदर बिबट्याला माणिक डोह येथील बिबट निवारण केंद्रात हलवण्यात आले असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.या बाबत सविस्तर माहिती अशी की आळे (ता.जुन्नर) येथील‌ तितर मळ्यातील शिवांश अमोल भुजबळ या तीन वर्षीय मुलावर बिबट्याने सोमवार दि.०९ रोजी हल्ला करून ठार केल्यानंतर मंगळवार (दि.१०) वनविभागाने घटनास्थळी व परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी १५ ठिकाणी पिंजरे लावले होते तर १५ ठिकाणी ट्रॅप कॅमेरा बसवण्यात आले होते. तोच नरभक्षक बिबट्या आहे का या बाबत माहिती मिळाली नाही.

सदर क्षेत्राचे थर्मल ड्रॉनद्वारे टेहळणी केली जात होती. २४ तास बिबट्याचा शोध घेतला जात होता. क्षेत्रात २४ तास ग्रस्त घालण्यात येत होती. काल शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी भुजबळ कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन केले. त्यांच्या वेदना समजून घेऊन शासनाच्या वतीने २५ लाखांपैकी उर्वरित पंधरा लाखांचा धनादेश भुजबळ कुटुंबयांना देण्यात आला.

याप्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम, सुरज वाजगे, माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, माजी उपसभापती गंगाराम गुंजाळ, अजय कुऱ्हाडे, माऊली कुऱ्हाडे, निलेश भुजबळ, कांताराम डोके, सहाय्यक उपवनसंरक्षक अमोल भिसे, वनक्षेत्रपाल वैभव काकडे, वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण, मयत शिवांशचे वडील अमोल भुजबळ, अविनाश गडगे तसेच भुजबळ कुटुंबीय उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे