राजुरीच्या गणेश सहकारी दूध संस्थेला महाराष्ट्र राज्य आदर्श दूध संस्था पुरस्कार प्रदान
1 min readराजुरी दि.१३:- गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या. राजुरी (ता जुन्नर) या संस्थेस नुकताच मुंबई येथे दैनिक नवराष्ट्र मार्फत आयोजित ‘ नवराष्ट्र सहकार पुरस्कार 2023’ मध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे शुभहस्ते व सुनील तटकरे, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संस्थेस ‘महाराष्ट्र राज्य आदर्श दूध संस्था पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार स्विकारताना संस्था चेअरमन बाळासाहेब हाडवळे, संस्था व्हाइस चेअरमन लक्ष्मण घंगाळे, संस्था संचालक मंडळ व सचिव उपस्थित होते. संस्थेला पुरस्कार मिळाल्याने आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, गावच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.