श्री साईगणेश कृपा पतसंस्थेकडून सभासदांना १० टक्के लाभांश, २ लाखांचा विमा, संस्थेला ९ लाखांचा नफा
1 min readमंगरुळ दि.१२:- श्री साईगणेश कृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगरुळ (ता. जुन्नर) ची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश लामखडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. सभेचे प्रास्ताविक कार्यकारी उपसरपंच व संचालक दत्तात्रय लामखडे यांनी केले.
संस्थेचे वर्ष अखेर सभासद संख्या ५८४ तर ठेवी ६ कोटी रुपयांच्या आहेत. ४ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज वाटप, बॅक ठेवी ३ कोटी असून संस्थेचा वार्षिक नफा ९ लाख ३ हजार रुपये असून सभासदांना १० टक्के लाभांश, २१२ रुपये चा विमा संरक्षण (११ टक्के) व दीपावली शुभेच्छा भेटवस्तू (१५ टक्के) देण्याचे मंजूर करण्यात आले.
सभेची सुरुवात दिवंगताना श्रद्धांजली अर्पण करुन करण्यात आली. सुत्रसंचालन बाळासाहेब लामखडे यांनी केले तर अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास रामभाऊ लामखडे यांनी केले. या वेळी संस्थेचे मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, गावच्या लोकनियुक्त सरपंच तारा दत्तात्रय लामखडे, संस्थापक अध्यक्ष निलेश लामखडे,
उपाध्यक्ष मनिषा कोरडे, माजी चेअरमन तुकाराम लामखडे, सचिव कैलास /विलास लामखडे, संचालक ज्ञानेश्वर येवले, बाबाजी कोरडे, बाळासाहेब लामखडे, दता लामखडे, नवनियुक्त संचालकांचा सत्कार खंडू खुटाळ, विक्रम लामखडे, सुनील वाजे, अण्णासाहेब लबडे, चंद्रशेखर भोजणे, गोपीनाथ लामखडे, सुनीता खराडे, शितल गाडगे, सुप्रिया मनसुख, तसेच सर्व संचालक मंडळ, कर्मचारी, सभासद उपस्थित होते.