आंबेगाव ८ महिन्याच्या मेंढपाळाच्या बाळावर बिबट्याचा हल्ला; आईने प्रतिकार करत वाचवला बाळाचा जीव

1 min read

आंबेगाव दि.११:- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात धनगर समाजाच्या आठ महिन्याच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मंगळवार दि.१० रोजी रात्री च्या दरम्यान थोरांदळे फुटाणे मळा येथे घडली आहे. बिबट्याने हल्ला केल्यावर मुलाच्या आईने बिबट्यास जोरदार प्रतिकार करत आपल्या मुलाचे प्राण वाचवले आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की, एका शेतात धोंडीभाऊ करगळ या मेंढपाळाचा वाडा बसलेला होता. मेंढपाळाची पत्नी सोनल करगळ ही तिच्या आठ महिन्याच्या मुलाला वाड्याचे शेजारीच बाहेर जवळ घेऊन झोपली होती. रात्री २ वाजण्याच्या सुमारास मुलाचा हात अथरुनाचे बाहेर पडला होता. त्यावेळी बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलाचा हात तोंडात धरत ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोनल करगळ यांना जाग आली असता तिने मुलाला ओठत बिबट्याला प्रतिकार सुरु केला तिने एका हाताने बिबट्याचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत एका हाताने मुलाला वाचवण्यासाठी धडपड सुरु केली व जोर जोरात आरडा ओरडा केला. त्यामुळे बिबट्या पळून गेला. या हल्ल्यात मुलाच्या हाताला दात लागला असून पोटाला नख्या लागल्या आहेत.सदर मुलावर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे