सिंगल फेज डीपी व लाईनसाठी पारनेरला ३३ कोटींचा निधी:- आमदार नीलेश लंके

1 min read

पारनेर दि.१२:- महावितरणच्या आर डी एस एस योजनेअंतर्गत पारनेर-नगर मतदारसंघात सिंगल फेज डीपी व लाईनच्या कामसाठी ३३ कोटी रूपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती आ. नीलेश लंके यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ सोमवार दि.१६ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याचेही आ. लंके म्हणाले. आर डी एस एस योजनेअंतर्गत पारनेर-नगर मतदारसंघात सिंगल फेज डीपी व सिंगल फेज लाईनचे काम मार्गी लावण्यासंदर्भात आ. नीलेश लंके यांनी दि. १८ ऑगस्ट २०२२ रोजी महावितरणकडे पत्रव्यवहार करून हे काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्यास यश आले असून तब्बल ३३ कोटींचा निधी त्यासाठी मंजुर करण्यात आला आहे. हे काम पुर्ण झाल्यानंतर तालुक्यातील वीजेची समस्या दुर होणार असून ग्राहकांना पुर्ण दाबाने व सुरळीत वीजपुरवठा होऊ शकेल. या योजनेअंतर्गत एकूण ३३६ डीपी मंजुर करण्यात आल्या असून २५६ पारनेर तालुक्यात तर ८० नगर तालुक्यातील गावांसाठी आहेत. पारनेर तालुक्यात २२९ किलोमिटर सिंगल फेज एलटी लाईन तर नगर तालुक्यात ७९ किलोमिटर एल टी लाईन टाकण्यात येणार आहे. थ्री फेज लाईनसाठी पारनेर तालुक्यासाठी २०० किलोमिटर तर नगर तालुक्यास ५७ किलोमिटरसाठी निधी मंजुर झाला आहे.▪️विविध फिडरसाठी मंजुर करण्यात आलेल्या डीपी पुढीलप्रमाणे
गुणोरे एजी निघोज ५, गुणोरे एजी जवळा २, निघोज एजी २, म्हसे खुर्द १, देवदैठण,वाडेगव्हाण २, नारायणगव्हाण९, दुर्गादेवी २,भाळवणी २, रांजणगांव पिंपरीगवळी 1, रांजणगांव 2, रूईछत्रपती ४, जातेगांव ५, घाणेगांव ५, मुंगशी ५, सुपा २, हंगा ५,पुणेवाडी २०, डिकसळ ९, पानोली ३, गोरेश्‍वर २, वाळवणे ६,बाबुर्डी ५. कडूस ३, वडनेर बुद्रुक निघोज ७, वडनेर बुद्रुक ३, सांगवीसुर्या ३, रांधे ६, लोणीमावळा १, अळकुटी ८, देवीभोयरे ६, कोहकडी ५, राळेगणथेरपाळ ५ कोहकडी ३,नारायणगव्हाण ३, कुरूंद ६, सुतारवाडी एसपीपी ९, काळू ७ , पळसपुर ९, हिवरे पाडळी १२, पाडळीआळे ५, वडझिरे ३, सांगवी ५, दरोडी १, कळस ८, जवळा राळेगण १, जवळा २, शिरापुर ३, सिनारे वस्ती १, चोंभूत ३,म्हस्केवाडी ४, काकणेवाडी ३, मुक्तीधाम कान्हूर २, करंदी ४, किन्ही ४, अक्कलवाडी ३, कोरठण १३, कळस ५.▪️नगर तालुका
अकोळनेर २ कामरगांव २, सारोळा कासार ४, चास २, विळद ४,गवळीवाडा ३, शिंगवे,९ जखणगांव १२, नेप्ती १५, पिंपळगांव ७, टाकळीखातगांव ११, निंबळक ८,आरणगांव १

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे