JPL मधील खेळाडूंवर २४ लाख रुपयांची बोली, 13 नोव्हेंबर पासून रंगणार सामने
1 min read
निमगाव सावा दि.९:( प्रतिनिधी- पंढरीनाथ मते) – जुन्नर तालुक्यात निमगाव सावा येथे JPL म्हणजे जुन्नर प्रीमियर लीगच्या स्पर्धा 13 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये संपन्न होणार आहेत. या खेळाडूंचा निलाव नुकताच निमगाव सावा येथे संपन्न झालाय.
या निलावात खेळाडूची लाखोंची बोली लागली. जुन्नर तालूक्याबाहेरील आयकॉन मध्ये मावळचा निहाल तिस्मत याची सर्वाधिक १ लाख २ हजार रुपयाची बोली लागली. या खेळाडूला विकीभाऊ पारखे निमदरी फायटर्स या संघान विकत घेतलं.
तसेच वाघोली चा राहुल सातव याला १ लाख रुपयाची बोली लागली असून मोरया वॉरियर्स निमगाव सावा संघाने विकत घेतले तर संगमनेरचा किरण खोबडे याला 97 हजार रुपयाला यशवंत भाऊ पाचंगे आणि शिरसाट स्पोर्ट्स यांनी विकत घेतले. यामध्ये राज्यातील व जुन्नर तालुक्यातील 156 खेळाडूंची 24 लाख रुपयांची बोली लागली.
यामध्ये ओतूरचा सुधीर साबळे या खेळाडूला 76 हजार रुपयाला अमर इलेव्हन संघाने विकत घेतले. नारायणगावचा राजू पाटे याला ५२ हजार रुपयाला संभाजीदादा काळे मित्रपरिवार संघाने विकत घेतले तर बेल्ह्याचा आजू बेपारी 42 हजार रुपया ची बोली लावून भागडेश्वर भागडी साकोरी संघाने विकत घेतले.
दरवर्षी या स्पर्धा निमगाव सावा येथे मोठ्या उत्साहात संपन्न होत असतात.राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प युवा ग्रुप व पांडुरंग क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित केल्या जातात.या वेळी युवा नेते अमित बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.