जुन्नर तालुका कुस्तीगीर संघाची नारायणगावात बैठक संपन्न; लवकरच तालुक्यात रंगणार जुन्नर तालुका केसरी स्पर्धा

1 min read

नारायणगाव दि.८:- पै. जगन को-हाळे यांच्या अध्यक्षतेखाली जुन्नर तालुका कुस्तीगीर संघाची बैठक गुरुवार दि.५ रोजी नारायणगाव येथे संपन्न झाली.

महाराष्ट्र केसरीसाठी पैलवानांची निवड चाचणी घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. येणाऱ्या दिवाळीमध्ये जुन्नर तालुका केसरी स्पर्धा घेण्याचे सर्वान मते ठरले. येणाऱ्या काळामध्ये तालुक्यातील पैलवानांचा कुस्तीमध्ये सहभाग वाढावा यासाठी आकर्षक बक्षिसे व रोख रक्कम देण्याचे ठरले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी तालुक्यातील पैलवानांना जिल्ह्यातील निवड चाचणीसाठी नेण्यासाठी चे नियोजन यावेळी करण्यात आले. यावर्षी जिल्ह्यात चांगली कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील पैलवानांचा उचित सन्मान करण्याचे ठरले आहे. या बैठकीस जुन्नर तालुका कुस्तीगीर संघाचे सर्व संचालक, पंच उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे