अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये परिसंवाद
1 min read
नारायणगाव दि.९:- रोटरी क्लब नारायणगाव यांच्या वतीने “दिशा” प्रोजेक्ट अंतर्गत पहिला परिसंवाद अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये संपन्न झाला. या प्रोजेक्ट मध्ये ज्येष्ठ रोटरियन डॉ.आनंद कुलकर्णी,रोटरियन योगेश भिंडे, रोटरियन संदीप गांधी, प्रियांका कामथ यांनी सहभाग घेतला.या वेळी नारायणगाव पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलिस अधिकारी होण्यासाठी असणाऱ्या परीक्षा तसेच पोलिसांच्या समोरील आव्हाने आणि लागणाऱ्या स्किल्स याबद्दल त्यांनी प्रबोधन केले. फक्त डॉक्टर आणि इंजिनिअर बनणे सोडून कशा रीतीने शासकीय अधिकारी बनू शकतात याबद्दल शेलार यांनी मार्गदर्शन केले.