उद्या राज्यभर स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

1 min read

मुंबई दि.३०:- स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमात नागरिकांनी उद्या रविवार (दि.१) उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, महाराष्ट्राला देशात स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवून द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

उद्या सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरुवात होणार असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात शहरे तसेच ग्रामीण भागात ‘एक तारीख एक तास’ हा उपक्रम केंद्र शासनाने आयोजित केला आहे. नागरिकांनी स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभागी व्हायचे आहे. गाव तसेच शहरातल्या प्रत्येक वार्डात सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरुवात होईल.

यात सफाई मित्रही सहभागी होतील.यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ” ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपण, आपले कुटुंबीय किंवा सहकारी जिथे कुठे असाल, तिथे आपण स्वच्छता मोहीम राबवून, या अभियानात योगदान द्यायचे आहे.

आपआपल्या परिसरात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावा-गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहीम राबवायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल आणि जिल्हा प्रशासन आपल्या मदतीसाठी सज्ज आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे