कल्याण- नगर महामार्गावर भरधाव कार ने पाच जणांना चिरडले; तीन ठार, दोन गंभीर जखमी
1 min read
ओतूर दि २५ : ओतूर परिसरात कल्याण- नगर महामार्गावर अपघाताचे सत्र चालू असून गेल्या दहा दिवसांत चार अपघात झाले आहेत. डिंगोर (ता. जुन्नर) येथे काल रविवार दि.२४ रोजी भरधाव कारने पदचार्याना चिरडले या अपघातात तीन ठार व दोन जखमी झाले आहेत.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, नगर- कल्याण महामार्गावर डिंगोरे गावच्या हद्दीत कठेश्वरी पुला जवळ काल रात्री सव्वा आठ वाजे दरम्यान हा अपघात झाला असून या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक पादचारी उपचारादरम्यान मृत झाला तर इतर दोन गंभीर जखमी आहे.
या अपघातात सुरमल मांजरे, दिनेश तारोले, जगदीश महेंद्रसिंग डावर हे तीन मयत झाले असून विक्रम तारोले, दिनेश जाधव (सर्व मूळ रहिवाशी मध्यप्रदेश) या दोघांवर आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याबाबत स्थानिकांनी दिलेली माहिती अशी की डिंगोरे येथे मध्यप्रदेश वरून दोन तीन दिवसापूर्वी काही शेत मजूर रोजगारासाठी आले होते.
रविवारी रात्री सव्वा आठ वाजे दरम्यान डिंगोरे गावातून शेती मुक्कामाच्या ठिकाणी नगर- कल्याण महामार्गावरून पायी चालले असताना कठेश्वरी पुला जवळ डिंगोरे बाजूला भरधाव वेगाने कल्याण बाजूने आलेल्या कारने या पायी चाललेल्या सर्वाना उडवले.
याबाबत ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांचे मार्गदर्शनात फरार झालेली कार अपघातानंतर अगदी काही वेळातच मिळवून देण्यात पोलिस हवालदार सुरेश गेंगजे, दत्ता तळपाडे, शामसुंदर जायभाय, रोहित बोबले, राजेंद्र बनकर या पोलीस कर्मचाऱयांनी यश मिळविले आहे. ही कार किया कंपनीची असून एम एच १२ व्हीक्यू ८९०९ क्रमांकाची आहे. याबाबत अधिक तपास ओतूर पोलीस करीत आहेत.