आळे महाविद्यालयातील विद्यार्थिनीचे अपघाती निधन; पोलीस भरती होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
1 min readआळेफाटा दि.२२:- आळेफाटा -कल्याण नगर महामार्गांवर असणाऱ्या ओतूर (ता.जुन्नर) जवळील कोळमाथा नामे शिवरातील आळे येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयात वाणिज्य विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेणारी राष्ट्र छात्र सेनेची विध्यार्थीनी ऋतुजा अशोक डुंबरे (वय १९) हिचे दि.२० सप्टेंबर रोजी तिच्या घरापासूनच काही अंतरावर पीकअपच्या धडकेत अपघाती निधन झाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तिला शिक्षण घेऊन पोलीस भरती मध्ये सामील होऊन देश सेवा करण्याचे तिचे ध्येय आणि स्वप्न होते अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव व प्रा. संजय वाकचौरे यांनी दिली. अपघाती निधन झाल्याने मात्र तिचे स्वप्न अपूर्ण राहिले असून या घटनेने संपूर्ण परिसरातून मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे.