जुन्नर च्या पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी
1 min readबेल्हे दि.२३:- जुन्नर च्या पूर्व भागाला परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाच वातावरण आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात यंदा मोसमातला चांगला पाऊस झाला आहे. शुक्रवार दि.२२ व शनिवार दि.२३ सायंकाळी दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे या भागाला दिलासा मिळाला आहे. काही भागात ओढे,नाले खळखळून वाहू लागले आहेत. हा पाऊस यंदाचा पहिलाच दमदार पाऊस झाल्यास झाला आहे. बेल्हे, गुंजाळवाडी, गुळुंचवाडी, राजुरी,सा, तांबेवाडी,बोरी,आळे,पारगाव,मंगरुळ,बांगरवाडी,आणे, पेमदार,शिंदेवाडी, नळवणे या गावांत पावसाने जोरदार हजेरी लावली.आणे पठारावरील नळवणे शिंदेवाडी,आनंदवाडी, नळवणे, व्हरुंडी या भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा व पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या भागाला चांगलाच दिलासा मिळाला आहे. येथील बंधारे तलाव भरले नसले तरी यावर्षीतला हा सर्वात मोठा पाऊस असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.पाचव्या दिवसाच्या गणपतीचे विसर्जन असल्यामुळे अनेक भाविकांना पावसामध्येच विसर्जन करावे लागले.