आण्याच्या बलराम सहकारी दूध संस्थेला आदर्श दूध संस्था पुरस्कार

1 min read

आणे दि.२२:- पुणे जिल्हा सहकारी दूध संस्था संघ मर्यादित कात्रज डेअरी च्या वतीने २०२२-२३ चा दिला जाणारा आदर्श दूध संस्था पुरस्कार बलराम सहकारी दूध संस्था आणे (ता. जुन्नर) यांना जाहीर झाला असल्याची माहिती चेअरमन ज्ञानेश्वर संभेराव यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण बुधवार दि.२७ रोजी कात्रज येथे केले जाणार आहे. बलराम दूध संस्थेने संघास चांगला गुणप्रतीचा वर्षभर सातत्याने केलेला दुधाचा पुरवठा व संस्थेच्या दैनिक कामकाजासाठी कात्रज दूध संघाच्या वतीने हा पुरस्कार दिला असल्याची माहिती कात्रज दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी दिली. बलराम दूध संस्था ही आणे येथील सर्वात मोठी दूध संस्था असून दिवसाला २७०० ते २८०० लिटर दूध संकलन येथे होत असते. दुधाची चांगली गुणवत्ता संस्था टिकून असून पुरस्कार जाहीर झाल्याने येथील गवळी बांधव ही अतिशय आनंदी झाले आहेत.पुरस्कार जाहीर झाल्याने गावच्या सरपंच प्रियंका दाते यांनी संस्थेचे अभिंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे