दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात “मेरी माटी, मेरा देश” उपक्रम

1 min read

निमगाव सावा दि.२१:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित, श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच, पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय, निमगाव सावा (जुन्नर) मध्ये “मेरी माटी, मेरा देश” उपक्रमांतर्गत “अमृत कलश व सेल्फी विथ माटी” उपक्रम बुधवार दि.२० रोजी महाविद्यालयात राबवण्यात आला. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली माती आणून त्याबरोबर सेल्फी काढला व ती अमृतकलश यामध्ये जमा केली. हा अमृतकलश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून देशाची राजधानी दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. देशभरातून जमा झालेल्या या माती मधून, तेथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. असा हा नाविन्यपूर्ण उपक्रम देशभरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत असल्याचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन मोजाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. छाया जाधव यांनी “मेरी माटी, मेरा देश” या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सर्व प्राध्यापक/प्राध्यापिका वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे