शेतकऱ्यांच्या विजेच्या मोटारींची चोरी करणाऱ्या चोरट्यांना आळेफाटा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1 min readआळेफाटा दि.१३:- शेतक-यांच्या शेतावरील व कॅनॉलवर असणारे इलेक्ट्रीक मोटारी चोरणारे चोरटे आळेफाटा पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून ३ लाख ३३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आळेफाटा पोलीस स्टेशन येथे दिनांक ०३/०९/२०२३ रोजी फिर्यादी नामे राजेंद्र सखाराम कु-हाडे वय ५० वर्षे रा. कैचानमळा आळे ता. जुन्नर जि.पुणे यांनी फिर्याद दिली की, ३,००० रूपये अंदाजे किंमतीची त्यांचे मालकीची इलेक्ट्रीक पाण्याची मोटार मे महीन्यात २०/५/२०२३ रोजी सकाळी ९/०० वा चे सुमारास मौजे आळे ता जुन्नर जि.पुणे
गावचे हददीतून पिंपळगाव जोगा डावा कॅनॉल वरील कैचानमळा येथील इलेक्ट्रीक पाण्याच्या मोटार कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे संमतीशिवाय मुददाम लबाडीचे इरादयाने चोरी करून चोरून नेली आहे. तसेच त्यांचेसोबत वसीम मनियार, गणपत कोंडीभाउ कु-हाडे, विशाल हाडवळे यांच्या सुदधा ७.५ एच.पी.ची व डावखरवाडी येथील संदीप बबन डावखर यांच्या १० एच. पी.च्या टेक्स्मो कंपणीच्या २ इलेक्ट्रीक पाण्याच्या मोटारी चोरीस गेलेचे त्यांना समजले होते.
वगैरे मजकुरचे फिर्यादीवरून आळेफाटा पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरटयांचे विरुदध गु.र.नं. ५४२ / २३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचे तपासादरम्यान पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे ऋषिकेश बाळासाहेब भंडलकर रा. आळे डावखरवस्ती ता.जुन्नर जि. पुणे.
हा शेतामधील इलेक्ट्रीक मोटारी चोरत असुन तो त्याची विक्री सुध्दा करतो अशी गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाल्याने डावखरखरती आळे येथे जावुन दिले पत्यावर सदरचा संशयित इसम नामे ऋषिकेश बाळासाहेब भंडलकर रा. आळे डावखरवस्ती ता.जुन्नर जि.पुणे याचा दिले पत्यावर शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्याचेकडे सदरचे इलेक्ट्रीक मोटारींचे चोरीचे संदर्भाने चौकशी केली असता
त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदारांसह आळेफाटा पोलीस स्टेशनचे हद्दीत इतर ठिकाणवरूनही शेतक-यांचे इलेक्ट्रीक मोटारी चोरल्याचे कबुल केले असुन त्यासंदर्भाने आळेफाटा पोलीस स्टेशन येथे
१) गु.र.नं. ५६६ / २३ भा.द.वि. कलम ३७९२)) गु.र.नं. ५६७/२३ भा.द.वि. कलम ३७९ ३ ) ) गु.र.नं. १३४ / २३ भा.द.वि. कलम ३७९४ ) ) गु.र.नं. ५५५ / २३ भा.द.वि. कलम ३७९ ५ ) ) गु.र.नं. ५५३ / २३ भा.द.वि. कलम ३७९ ६) गु.र.नं. ५५४ / २३ भा.द.वि. कलम ३७९ असे गुन्हे दाखल आहेत. यातील अटक आरोपी याने सदर चोरलेल्या मोटारी या शहजाद अली भग्गन इद्रीसी यास विकलेल्या असुन त्याचेसोबत अजुन दोन मुले होती
अशी माहीती सांगीतल्याने त्यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता दोन्ही मुले ही अल्पवयीन असल्याचे लक्षात आल्याने त्यांना सदर गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेवुन पालकांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. अटक आरोपी यांचेकडुन गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल तसेच चोरलेल्या मोटारी जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्या खालील प्रमाणे
१) ३०,००० /- एक हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल नं. एम. एच. १४ / डी. एस / ९४३६ तिचा चॅसी नं.MBLHA10AWCHL41123 तिचा इंजिन नं. HA10ENCHL02076 २) ३,००० /- रू किंमतीची ५ एच.पीची टेक्समो कंपणीची इलेक्ट्रीक पाण्याची मोटार जु.वा.कि.अं. ३) ३०,००० /- रु. किंमतीची ७.५ एच.पीची टेक्समो कंपणीची इलेक्ट्रीक पाण्याची मोटार जु. वा. कि.
४) ३०,००० /- रु. किंमतीची ७.५ एच.पीची टेक्समो कंपणीची इलेक्ट्रीक पाण्याची मोटार जु.वा. कि. अं. ५) ३०,००० /- रु. किंमतीची ७.५ एच.पीची टेक्समो कंपणीची इलेक्ट्रीक पाण्याची मोटार जु.वा.कि.अं.
६) ३५,००० /- रु. किंमतीची १० एच.पीची टेक्समो कंपणीची इलेक्ट्रीक पाण्याची मोटार जु.वा. कि. अं. ७) ३०,००० /- रू. किंमतीची ५ एच.पी.ची टेक्समो कंपणीची इलेक्ट्रीक पाण्याची मोटार जु.वा. कि.
८) ३००० /- रु. किंमतीची ५ एच.पी.ची किचेन्ट कंपणीची इलेक्ट्रीक पाण्याची मोटार जु.वा. कि. अं.. ९) १०,००० /- रु. किंमतीची ३ एच.पी.ची लक्ष्मी कंपणीची इलेक्ट्रीक पाण्याची मोटार जु.वा. कि. अं.