संत निरंकारी मिशन” तर्फे नारायणगावात १०० रक्तदात्यांनी केले मानवतेप्रती रक्तदान

1 min read

नारायणगाव दि.१२:- निरंकारी ‘सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज’ यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोनच्या नारायणगाव ब्रांच वतीने संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा ‘संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन द्वारा आयोजित संत निरंकारी सत्संग भवन, नारायणगाव या ठिकाणी रविवार दि. १० सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत विशाल रक्तदान शिबिरात १०० जणांनी मानवतेप्रती रक्तदान करून हे यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी, पिंपरी (पुणे) यांनी संकलित केले.

या शिबिराचे उदघाटन नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच बाबू उर्फ योगेश पाटे सह वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांच्या हस्ते व आळेफाटा क्षेत्राचे संयोजक चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या उपस्थित करण्यात आले.

संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये संत निरंकारी समागमामध्ये प्रथमतःच करण्यात आले होते, ज्याचे उदघाटन तत्कालीन सद्गुरू ‘बाबा हरदेव सिंह जी महाराज’ यांनी केले होते आणि ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे मागील ३६ वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत बारा लाखाहून अधिक युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्याला किमान तीन शिबिरे मिशन द्वारे आयोजित केली जात असून वर्षाला ८ ते ९ हजार युनिट रक्त सरकारी रक्तपेढी मार्फत संकलित केले जाते.निरंकारी ‘बाबा हरदेव सिंह जी महाराज’ यांनी

मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, तर ते नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे !’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात ‘सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज’ यांच्या निर्देशानुसार निरंतर हा संदेश पुढे नेला जात आहे.

  संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित देखील करण्यात आले आहे.

वरील शिबीर हे आळेफाटा सेवादल युनिट संचालक संतोष कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी पार पडले व शेवटी या मानवतेच्या कार्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल संत निरंकारी मिशन, नारायणगाव शाखेचे मुखी सतीश वाणी यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे