नळवणे ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार?, ग्रामसभेत खडाजंगी; सरपंच अर्चना उबाळे यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

आणे दि.२९: नळवणे (ता. जुन्नर) येथील ग्रामसभेत ग्रामस्थांनी गावच्या सरपंच अर्चना उबाळे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा तसेच मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप करत ग्रामसभा बरखास्त करण्यास भाग पाडले.

गावात ग्रामपंचयती तर्फे करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी हिशेब मागितला असता सरपंच अर्चना उबाळे यांनी कामांचा तपशीलवार हिशेब न देता उडवाउडवीची उत्तरे देतात.

असा आरोप करून ग्रामसभेचे कामकाज रोखून धरले. सरपंच गावात विकास कामे करताना उपसरपंच किंवा इतर सदस्यांना विश्वासात घेत नाहीत असे सदस्यांनी ग्रामसभेत सांगितले.ग्रामस्थांनी सभेचे कामकाज रोखून धरल्याने विषय पत्रिकेवरील इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा न होताच ग्रामसभा बरखास्त करण्यात आली.

यावेळी ग्रामसेवक गुलाब जगताप, उपसरपंच संजोग सहादू शिंदे, सुरेश गगे, राम गगे, रामदास शिंदे, नवनाथ नवले, माजी सरपंच तुषार देशमुख, पोलीस पाटील शिल्पा गगे, गोपीनाथ शिंदे, कैलास शिंदे, नामदेव गंगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

नळवणे येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा सोमवारी (दि.२८) रोजी घेण्यात आली. ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड, बेल्हे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना, गावात झालेल्या विकास कामांचा आढावा घेणे आदि महत्वाचे विषय असल्याने सभेसाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“गावातील १०९ ग्रामस्थ सरपंच अर्चना उबाळे यांच्या कामकाजावर नाराज असून ग्रामस्थांनी सह्यांच पत्र बनवल असून या संदर्भात बिडियो कडे पत्र व्यवहार करणार आहोत.तसेच उपसरपंच व इतर सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच अर्चना उबाळे मनमानी कारभार करत असतील आणि सदस्यांनी सुचविलेली विकास कामे केली जात नसतील तर सर्व सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.

– राम गगे,
अध्यक्ष, पाणलोट समिती, नळवणे

सदर ग्रामसभा अगदी सुरळीत होवुन अजिंठा वरील सर्व विषयांवर शांतपणे चर्चा झाली. माजी सरपंच तुषार देशमुख यांनी 15 वित्त आयोगतील खर्च विचारला आसता इस्टिमेट आणि एमबी दाखवली परंतु त्यांनी एकमताने ठरवुन गोंधळ घालून तंटामुक्ती अध्यक्षाची निवड प्रक्रिया थांबवली. सदस्य प्रत्येक मिटींगला हजर नसल्यामुळे त्यांना मिळालेली माहीती अर्धवट होती. सदर ग्रामसभेत सदस्यांचे चांगले योगदान होते. परंतु 2/3 व्यक्तींनी वैयक्तिक आकसापोटी विनाकारण ग्रामसभेत गोंधळ घातला.”

अर्चना उबाळे, सरपंच नळवणे

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे