संदीपान पवार यांनी अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त महाविद्यालयास दिली बहुमोल ग्रंथ संपदा
1 min readनिमगाव सावा दि.१४:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्था व श्री पांडुरंग ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मा. संदिपान पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा महाविद्यालयामध्ये उत्साहा मध्ये पार पडला. या अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार, निमगाव सावा तंटामुक्तीचे अध्यक्ष परशुराम लगड, संस्थेचे सचिव परेश घोडे, निमगाव सावाचे सरपंच किशोर घोडे, न्यू गणेश रोडलाईन्सचे मालक बाळासाहेब थोरात, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर अरविंद कांबळे. प्रगतशील शेतकरी शांताराम गाडगे,संदिपान पवार मित्रपरिवार, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मा. संदीपान पवार यांजकडून महाविद्यालयास 40 बहुमोल ग्रंथ संपदांची भेट देण्यात आली. प्रा शिवाजी साळवे, परेश घोडे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव, पांडुरंग पवार यांनी संदिपान पवार यांस वाढदिवसानिमित्त आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.