सह्याद्री व्हॅली आय.टि.आय कॉलेजचा ९० टक्के निकाल

1 min read

राजुरी दि.१९:- व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आय.टी.आय च्या परीक्षेत सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आय.टी.आय राजुरी (ता.जुन्नर) च्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले असून परीक्षेत कॉलेजचा निकाल ९० टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्या प्रियांका औटी यांनी दिली.

इलेक्ट्रीशियन शाखेत प्रथम वर्ष मध्ये प्रथम क्रमांक हरीश म्हस्कुले ८१.६०, द्वितीय क्रमांक गौरव दिवेकर ७९.८०, तृतीय क्रमांक संकेत सोडनार ७८.६०, द्वितीय वर्ष प्रथम क्रमांक स्वप्नील शिंदे ८२.४०, द्वितीय क्रमांक श्रध्दा चौरे ७९.८०, तृतीय क्रमांक स्वप्नील उगले ७८ टक्के, वेल्डर शाखेत प्रथम क्रमांक आकाश बोरचटे ७६ टक्के, द्वितीय क्रमांक चंद्रकांत वायाळ ७४ टक्के, CHNM शाखेत प्रथम क्रमांक संदीप जाधव ८२.९०,

द्वितीय क्रमांक महेश बतुळे ७८ टक्के, तसेच फिटर शाखेत प्रथम क्रमांक ओमकार सोनवणे ७९ टक्के, द्वितीय क्रमांक ज्ञानेश नायकोडी आणि अभिषेक भोईर ७४ टक्के, एवढे गुण मिळवून यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन चेअरमन व्ही.आर.दिवाकर तसेच सर्व संचालक मंडळाने केले. या महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष इलेक्ट्रिशीयन, फिटर, वेल्डर आणि कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग च्या विद्यार्थांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी फ्रेशर पार्टी चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

द्वितीय वर्ष च्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विविध कलागुण सादर केले.यावेळी कॉलेजचे विश्वस्त सचिन चव्हाण आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य पी.बलराम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आय.टी.आय कॉलेज च्या प्राचार्या प्रियांका औटी आणि उपप्राचार्य सचिन आभाळे यांनीही विद्यार्थ्यांनी कश्या प्रकारे जबाबदारीचे भान ठेऊन भविष्याची वाटचाल करावी याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ITI चा सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. संतोष शिरसाठ यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे