जाधव महाविद्यालय आळे मध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्राणीशास्त्र अभ्यास रचना कार्यशाळा संपन्न

1 min read

आळे दि.१८:- जाधव महाविद्यालय आळे मध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाने प्रथम वर्ष विज्ञान या वर्गाचा नवीन अभ्यासक्रम तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ.आर. डी. चौधरी व ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे यांचे शुभहस्ते झाले. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्याभिमुख अभ्यासावर विद्यार्थी त्याच्या क्षमतेनुसार उद्योग व्यवसाय सुरू करू शकेल अशा प्रकारचा अभ्यासक्रम तयार करणार असल्याचे डॉ. आर.डी. चौधरी यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी प्राणिशास्त्र विषयातील पदवी प्राप्त केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय अथवा नोकरी सहजगत्या प्राप्त करू शकेल यावर अभ्यासक्रम तयार करताना भर देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे संचालक किशोर कुऱ्हाडे यांनी कार्यकुशल व उत्पादनक्षम विद्यार्थी बनविण्यासाठीचे तंत्रज्ञान अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावे अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. प्रवीण जाधव यांनी प्राणीशास्त्र विषयाकडे जास्तीत जास्त विद्यार्थी कसे आकर्षित होतील असा अभ्यासक्रम तयार करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. या कार्यशाळेसाठी पुणे,नगर व नाशिक जिल्ह्यांमधून 80 प्राध्यापक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्राणिशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. संदीप पोकळे, डॉ .रेशम भल्ला, डॉ. सुनील पाटील, डॉ .बबनराव माने सहभागी झाले होते.कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे सचिव अर्जुन पाडेकर, उपाध्यक्ष सौरभ डोके , खजिनदार अरुण हुलवळे , संचालक बाळासाहेब जाधव, बबन सहाणे, भाऊदादा कुऱ्हाडे, उल्हास सहाणे, शिवाजी गुंजाळ, बाबु कुऱ्हाडे, जीवन शिंदे, दिनेश सहाणे, सम्राट कुऱ्हाडे, देविदास पाडेकर, कैलास शेळके, रमेश कुऱ्हाडे आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अरुण गुळवे, सूत्रसंचालन प्रा.संतोष राठोड व आभार प्रदर्शन डॉ.जयसिंग गाडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ.अरुण गुळवे , प्रा. गोपीनाथ श्रीरामे, बबन कुऱ्हाडे, तुकाराम सहाने , विलास कुऱ्हाडे, कारभारी कडाळे, महेंद्र भुजबळ यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे