पुणे जिल्ह्यात ‘या’ दोन दिवशी मद्यविक्री पूर्णतः बंद राहणार; जिल्हा अधिकारी राजेश देशमुख यांचे आदेश
1 min readपुणे दि.१४:- पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पुणे जिल्ह्यात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 19 आणि 28 सप्टेंबरला दारु विक्रीवर बंदी करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात शांतता रहावी यासाठी हे आदेश काढण्यात आले आहे. जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती 19 आणि 28 सप्टेंबर रोजी बंद राहतील. तसेच 29 सप्टेंबरला पुणे महानगरपालिका क्षेत्रात विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील आणि गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.