केरळच्या एस.के.हमराजची सायकलवारीतून २९६ गडकिल्ले सफर
1 min read
आळेफाटा दि.१३- अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या ३७० सायकल वरून परिक्रमापैकी २९६ किल्ले १६ महिन्यांत केरळ येथील रहिवासी शिवराज गायकवाड यांनी प्रतापगडापासून सुरुवात करून किल्ले सिंदोळा (मढ, ता.जुन्नर) येथे जात असताना मंगेश काकडे (शिवसेना, तालुकाप्रमुख जुन्नर), राहुल ढेंबरे पाटील (संस्थापक/प्रदेशाध्यक्ष, शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य), गिरीष कोकणे (मा.अध्यक्ष, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट,आळे. संतवाडी,कोळवाडी), युवा उद्योजक मंगेश कु-हाडे (सदस्य, ग्रामपंचायत आळे), युवा उद्योजक ऋषिकेश शेळके, बाबु कोकणे, पिंटु भुजबळ तसेच ग्रामस्थांनी स्वागत केले.एस के हमराज उर्फ शिवराज गायकवाड दिनांक ०१ मे २०२२ पासून केरळ येथून निघाला आहे. सायकलवर प्रवास करत २९६ गड किल्ले सर केले आहे.
घनदाट जंगल कडे कपारीतून वाट काढत किल्ल्यावर जाताना या प्रवासाचे अनेक अनुभव हमराज कथन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व आणि दातृत्व फार मोठे असल्याचा अनुभव संपूर्ण प्रवासात मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये प्रवासात अनेक जण अस्तेवाईकपणे चौकशी करतात. महाराष्ट्राची संस्कृती मला प्रचंड आवडली येथील लोक आपुलकीने वागतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांची सफर करण्याचे ठरवून या सफरीला सुरुवात केली आहे.
असे हमराजाने सांगितले.आळेफाटा येथे आल्यानंतर उपस्थित मान्यवर शिवभक्तांनी स्वागत करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.अगदी लहान वयात गडकिल्ले सफर करण्याची आवड असणाऱ्या बाल शिवभक्त शंभुराजे राहुल पा.ढेंबरे याची तर अगदी थोड्याच वेळात सायकलस्वार शिवराज गायकवाड यांच्याशी मैत्री झाली.